आजच जाहीर होणार महाविकास आघाडीचा मिनिमम कॉमन प्रोग्राम !

0

मुंबई: आज महाविकास आघाडीचा शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहे. तर त्यांच्यासोबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार मंत्री पदाची शपथ घेणार आहे. दरम्यान आजच दुपारी २ वाजता महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद घेणार असून त्यात किमान समान (मिनिमम कॉमन प्रोग्राम ) जाहीर होणार आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, कॉंग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील माहिती देणार आहे.

मिनिमम कॉमन प्रोग्राममध्ये काय ठरले आहे? हे आज स्पष्ट होईल. मिनिमम कॉमन प्रोग्रामच्या आधारे तिन्ही पक्ष एकत्र आले असून आज सरकार स्थापन करणार आहे.