आजच बहुमत सिद्ध करू द्या; कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद !

0

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय घटनेनंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. मात्र याविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नेते सुप्रीम कोर्टात गेले आहे. यावर आज रविवारी तातडीने सुनावणी घेण्यात येत आहे. कॉंग्रेसतर्फे कपिल सिब्बल तर सरकारकडून सॉलीसीटर जनरल तुषार मेहता कोर्टात भूमिका मांडत आहे. युक्तिवाद सुरु झाल्यानंतर शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी भाजपने सभागृहात तातडीने बहुमत सिद्ध करावे अशी मागणी केली, आजच तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी सिब्बल यांनी कोर्टात केली. पहाटे शपथविधी होणे, राष्ट्रपती राजवट हटविण्याची शिफारस कधी झाली याबाबतची माहिती देण्याची मागणी कपिल सिब्बल यांनी केले आहे. भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

भाजप आणि अपक्ष आमदारांतर्फे मुकुल रोहतगी आणि सॉलीसीटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. रविवार असताना सुनावणी घेण्याची काय आवश्यकता होती असा सवाल रोहतगी यांनी उपस्थित केला आहे.