आजच महाविकास आघाडीचा संयुक्त नेता निवडीसाठी बैठक !

0

मुंबई: राज्याच्या राजकारणाला आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे वेग आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या तातडीने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. तत्पूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाच्या संयुक्त नेता निवडीसाठी आज संध्याकाळी ५ वाजता बैठक बोलविण्यात आली आहे. महाविकास आघाडीचा संयुक्त गटनेता यावेळी निवडला जाणार आहे. शिवसेनेचे महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार असल्याने आणि महाविकास आघाडीचे नेतृत्त्व शिवसेनेकडे देण्यात येणार असल्याने शिवसेना नेत्यांचीच महाविकास आघाडीच्या गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार याबाबत निर्णय घेणार आहे.

दरम्यान आजच कॉंग्रेसने विधिमंडळ गटनेत्याची निवड केली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.