जळगाव। इंडीयन मेडीकल असोसिएशन आणि अॅकेडमी ऑफ मेडीकल स्पेशालिटी यांची ‘अॅम्सकॉन 2017’ ही राज्यस्तरीय परीषदेस शनिवार 5 रोजी पासून सुरुवात होत आहे. 5 व 6 ऑगस्ट रोजी कमल पॅराडाईज येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आयएमए जळगाव शाखेतर्फे आयोजीत या राज्यस्तरीय परिषदेला राज्यभरातून 600 डॉक्टर उपस्थित राहणार आहे.
जळगावात या परीषदेच्या आयोजनाचा बहुमान प्रथमच जळगाव आयएमएला मिळाला असल्याचे सचिव डॉ.राजेश पाटील यांनी सांगितले आहे. गेल्या दोन महिन्यापासून या राज्यस्तरीय परीषदेच्या आयोजनाची तयारी सुरू आहे. माजी खासदार डॉ.उल्हास पाटील हे या परिषदेचे प्रमुख आहेत. डॉ. विलास भोळे हे आयोजन समितीचे अध्यक्ष असुन सचिव डॉ. स्नेहल फेगडे हे आहेत. या परीषदेला सकाळी 9 वाजता सुरवात होणार आहे. समारोप 4 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रवी वानखेडकर यांच्या हस्ते होणार असुन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. आयएमएचे माजी उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील आणि डॉ. प्रताप जाधव यांचा यावेळी सन्मान केला जाणार असल्याचे सचिव डॉ. राजेश पाटील यांनी कळविले आहे.