आजपासून गुगलची ‘अँड्रॉईड पी’ सिस्टिम लागू !

0

मुंबई: गुगलकडून अँड्रॉईडची नवी ऑपरेटिंग सिस्टिम लॉन्च करण्यात आली आहे. ‘अँड्रॉईड पी’ असे या ऑपरेटिंग सिस्टिमचे नाव आहे. अँड्रॉईडच्या ऑपरेटिंग सिस्टिमला खाद्यपदार्थांची नावे दिली जातात. त्यानुसार नव्या सिस्टिमला ‘पाय’ असे नाव देण्यात आले आहे. ही नवी सिस्टिम आजपासून उपलब्ध होणार आहे. या सिस्टिमला सपोर्ट करणारे फोन आज अपडेट होणार आहे.

अँड्रॉईड पीमध्ये नवा इंटरफेस देण्यात आला आहे. याशिवाय या नव्या सिस्टिममध्ये अनेक नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. यापैकी मशीन लर्निंग अॅल्गोरिदम हे फिचर सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामुळे मोबाईलचा ब्राईटनेस आपोआप अॅडजस्ट होतो. मोबाईल फोन वापरकर्त्याच्या सवयीनुसार, त्याच्या प्राधान्यक्रमानुसार ब्राईटनेस आपोआप अॅडजस्ट केला जातो. याशिवाय फोनची बॅटरीदेखील अॅडजस्ट होते. युजरच्या सवयीनुसार सॉफ्टवेअरमध्ये अॅडजस्टमेंट करुन त्यानुसार बॅटरी चार्ज करण्याची क्षमता नव्या सिस्टिममध्ये आहे.

मोबाईल युजरच्या कृतीवरुन पुढील आव्हानासाठी सज्ज राहण्याची क्षमतादेखील या अँड्रॉईड पीमध्ये आहे. त्यामुळे युजरने मोबाईलला हेडफोन कनेक्ट करताच त्याच्यासमोर प्लेलिस्ट ओपन होते. अँड्रॉईड पीला सपोर्ट करणाऱ्या गुगलच्या फोनवर आजपासून ही सिस्टिम उपलब्ध असेल. त्यामुळे गुगलचे फोन आजपासून अपडेट होतील. मात्र वन प्लस, सोनी, एमआय, ओप्पो आणि विवो कंपन्यांचे फोन वर्षाच्या अखेरपर्यंत अपडेट होतील.