आजपासून चौकी येथे श्री तुळजादेवीचा यात्रोत्सव

0

नवापूर। तालुक्यातील चौकी या गावी जयश्री तुळजा देवीची यात्रा रोजी 14 एप्रिल शुक्रवार सुरू होत आहे. शुध्द चैत्र महिन्याचा पौणिमेला व हनुमान जयंतीच्या आसपास ही यात्रा भरत असते. मातेची मुर्ती संगमवरी आहे. तीच्या पायाखाली महिषासुरचे शव आहे. डाव्या हाताने महिषासुरची शेंडी पकडली आहे. उजव्या हाताने त्याचा छातीत त्रिशुल खूपसुन उजवा पाय त्याचा देहावर आहे. चरणाजवळ अनूभुतीने मुकॅड घातली आहे. मातेने अनेक आयुध धारण केलेली आहे. उजवीकडे सिंह असुन बाजुला साध्वीची लहानशी प्रतिमा कोरलेली दिसते. हिंदुशास्त्रा प्रमाणे एकादा प्रतिष्ठापित करण्यात आलेली मुर्ती पुन्हा हलवता येत नाही पंरतु ती मुर्ती हलवता येते. कारण ती शक्तीपीठ असुन भवानी मातेची मुर्ती चल आहे.

मदन चिकना केवडीपाडा, सोनारकर रायसिंग मामा सोंगाड्या पार्टीचे आयोजन
येथे नवरात्र महोत्सवात आगळे वेगळे महत्त्व आहे. चौक येथील यात्रेत येणार्‍या भाविकांना झाडे लावा झाडे जगवा, पाण्याची बचत करा, स्वच्छता हा समाज जागृतीपर एक चांगला संदेश दिला आहे. शुभ चिंतावे,शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, सत्कर्माचा पुण्याईने नर जन्माचे सार्थक व्हावे हा एक चांगला विचार यात्रेचा माध्यमातून यात्रेचा संयोजकांनी दिला आहे. यात्रेत दुकानदारांना सडणारी व कुंजणारी फळे यात्रेत विकु नये, नेमून दिलेल्या जागेवरच दुकाने लावावी, खाण्याचे पदार्थ विकणार्‍यांनी स्वच्छता ठेवावी असे आवहन करण्यात आले आहे. सोंगाड्या पार्टीद्वारे उत्कृष्ट अभिनय व सादरीकरण कलाकार करतात वेशभूषा, नृत्य व गाणे या माध्यमातून रात्रभर सोंगाड्या पार्टीचा शानदार कार्यक्रम होत असतो 14 एप्रिल शुक्रवार रोजी मदन चिकना केवडीपाडा व सोनारकर रायसिंग मामा सोंगाड्या पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे