जळगाव । राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, शिक्षण विभाग जिल्हा परिषद व श्री स्वामी समर्थ विद्यामंदीर, कुसूंबा खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने 2017-18 वे 43 वे तीन दिवशीय जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन कुसूंबा खुर्द येथे करण्यात आले आहे. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आज 11 रोजी दुपारी 12.30 वाजता होणार आहे. उद्घाटन जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा उज्ज्वला मच्छिंद्र पाटील असणार आहेत.
शनिवारी समारोप
यावेळी शिक्षण सभापती पोपट भोळे, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, आरोग्य सभापती दिलीप पाटील, महिला बालकल्याण व बांधकाम सभापती रजनी चव्हाण, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर, जिल्हा शैक्षणिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ.गजानन पाटील आदी उपस्थित राहणार आहे. विज्ञान प्रदर्शनाचे समारोप व बक्षीस वितरण शनिवारी 13 रोजी होणार आहे. समारोप अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती पोपट भोळे आहेत. प्राचार्य डॉ.गजानन पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. उपस्थितीचे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन, निरंतर शिक्षणाधिकारी आर.जे.पानपाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, ग.स.संचालक मनोज पाटील, मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील आदींनी केले आहे.