बडनेरा सेक्शनमध्ये इंजिनिअरींग ब्लॉक ; गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रवाशांची गैरसोय
भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील बडनेरा सेक्शनमध्ये पुल पुर्नबांधणीच्या कामासाठी विशेष इंजिअरींग ब्लॉक घेण्यात येणार असून त्यासाठी 13 मे पासून अप-डाऊन नरखेड, अमरावती व वर्धा पॅसेंजर अनिश्चित काळासाठी रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याने गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रवाशांची व चाकरमान्यांची मोठी गैरसोय होणार आहे.
या गाड्या झाल्या रद्द
गाडी क्रमांक डाऊन 51183 भुसावळ-नरखेड पॅसेंजर, अप 51184 नरखेड भुसावळ पॅसेंजर (14 मे पासून), अप 51152 नरखेड-नवी अमरावती पॅसेंजर, डाऊन 51151 नवी अमरावती-नरखेड पॅसेंजर (14 मे पासून), डाऊन 51197 भुसावळ-वर्धा पॅसेंजर, अप 51198 वर्धा-भुसावळ पॅसेंंजर (15 मे पासून) रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्या नेमक्या किती तारखेपर्यंत सुरू होतील याबाबत अनिश्चतता दर्शवल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या ब्लॉकमुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करीत सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रवाशांना केले आहे.