आजपासून भारतात रामराज्यपर्व: रामदेवबाबा

0

अयोध्या: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऐतिहासिक राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. भारतात दिवाळीसारखा हा उत्सव साजरा केला जात आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होईल. भूमीपूजनाची जय्यत तयारी करण्यात आली असून अयोध्यानगरी सजली आहे. दरम्यान योगगुरू रामदेव बाबा यांनी आजपासून भारतात रामराज्याला सुरुवात झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण भारतीय जनता या दिवसाची वाट पाहत आहेत. अखेर तो दिवस उगविला आहे, असे रामदेवबाबा यांनी सांगितले आहे.