पुणे । पुढील वर्षी होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या, मंगळवारपासून (15 मे) मतदार याद्या अद्ययावत करण्यात येणार आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार आहेत. या मोहिमेमध्ये एक जानेवारी 2019 पर्यंत 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवा मतदारांनाही सामावून घेतले जाणार आहे. शिवाय दुबार, मयत आणि स्थलांतरित व्यक्तींची नावे वगळण्यात येणार आहेत. सध्याच्या मतदार यादीत नोंद चुकीची झाली असल्यास ती दुरुस्तही होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार याद्या अद्ययावत करण्यात येणार असून, एक सप्टेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर केली जाणार असल्याचे जिल्हा उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी सांगितले. मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आणि नव्याने माहिती घेण्यासाठी बीएलओ घरोघरी जाणार आहेत. सध्याच्या मतदार यादीमध्ये एक जानेवारी 2018ला वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, काही मतदारांची नोंदणी झाली नसल्यास त्यांची नोंद होणार आहे. त्याचबरोबर एक जानेवारी 2019पर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण होणार्या युवा मतदारांची नावे समाविष्ट केली जाणार आहेत. त्यांना 20 जानेवारीपर्यंत ओळखपत्रे दिली जाणार आहेत. त्यांची नावे यादीत घेतानाच दुबार, मयत आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. संबंधित घरांना काल्पनिक क्रमांक द्यावा किंवा स्थानिक संस्थेमार्फत कायम क्रमांक देण्यात आला असल्यास त्याची माहिती गोळा करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक घरी बीएलओने भेट दिल्याचे स्पष्ट होईल,’ असेही सिंह यांनी स्पष्ट केले.
नावे शोधण्यासाठी सॉफ्टवेअर
मतदार यादीमध्ये दुबार किंवा समान असलेली नावे शोधणारे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. या नोंदीचे तीन प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे. not match/positive, not match/negative आणि doubtful अशा नोंदी मतदारांच्या नावापुढे करण्यात येतील. पेीं ारींलह/िेीळींर्ळींश अशी नोंद असल्यास संबंधित मतदारांना समान नोंद म्हणून समजण्यात येणार नाही. मात्र, पेीं ारींलह/पशसरींर्ळींश आणि र्वेीलींर्षीश्र अशी नोंद असल्यास प्रत्यक्ष जाऊन तपासणी होणार आहे. त्यामध्ये ती नावे वगळण्यासाठी अर्जाचा नमुना सात भरून घेतला जाणार आहे. मतदाराने हा अर्ज भरण्यास नकार दिल्यास नोटीस बजावून त्याचे नाव वगळण्यात येणार आहे,’ असेही श्रीमती सिंह म्हणाल्या.
मृत, स्थलांतरितांची नावे वगळणार
मृत मतदारांचे नाव वगळण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी अर्जाचा नमुना सात भरून दिल्यास ती कृती करण्यात येणार आहे. राजकीय पक्ष, अशासकीय संस्था किंवा अन्य मार्गाने मृत मतदारांची माहिती मिळाल्यास प्रत्यक्ष पाहणी करून नावे वगळली जाणार आहेत. कायमस्वरुपी स्थलांतरित झालेला मतदार अन्य ठिकाणी आढळून आल्यास त्याच्याकडून नमुना सात भरून घेतला जाणार आहे. मात्र, अशा मतदारांचा शोध लागत नसल्यास नावे वगळण्यापूर्वी दोन प्रौढ व्यक्तींच्या साक्षीने; तसेच कुटुंब किंवा शेजारच्या सदस्यांच्या साक्षीने नोटीस चिकटविण्यात येणार आहेत. त्यानंतरच नाव वगळण्याची कार्यवाही होणार आहे, असे मोनिका सिंह यांनी सांगितले.
मतदार यादी अद्ययावतीकरण
बीएलओे’कडून घरोघरी भेटी देणे 15 मे ते 20 जून 2018
प्रारुप मतदार यादी तयार करणे 31 ऑगस्ट 2018
प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे एक सप्टेंबर 2018
दावे, हरकती स्वीकारणे 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018
दावे, हरकती निकालात काढणे 30 नोव्हेंबर 2018
अंतिम मतदार यादी 4 जानेवारी 2019