रायगड- जनतेपर्यंत जाऊन सरकार विरोधी भूमिका मांडण्यासाठी ‘निर्धार परिवर्तनाच’ या घोषवाक्याखाली आजपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसची ‘निर्धा परिवर्तन यात्रे’ला सुरुवात होत आहे. रायगड जिल्ह्यातील पाचाडमध्ये जिजामातांच्या समाधीचे आणि रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदींची उपस्थिती असणार आहे.