16 जूनपासून रोज सकाळी नवे दर

0

मुंबई । पेट्रोल डिझेलचे दर 16 जूनपासून रोज ठरणार असून दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल पंपावर हे दर बदलण्यात येतील. ग्राहकांनाही दराबाबत एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने तेल कंपन्यांतर्फे ट्रायल स्वरूपात सद्य:स्थितीत मेसेज पाठवण्यात येत आहेत.

विविध मागण्यांसाठी पेट्रोल डिलर्स असोसिएशनने या निर्णयाला विरोध केला होता. मात्र, बुधवारी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पेट्रोल पंपचालकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 16 जूनपासून पेट्रोल डिझेलचे दर दररोज बदलणार आहेत. सद्य:स्थितीत तेल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलच्या दराबाबत रात्री 12 वाजता संदेश प्राप्त होतो. मात्र, आता दररोज सकाळी वाजता हे दर बदलणार आहेत. पेट्रोल डिझेलचे दररोज बदलेले दर दिसण्यासाठी ग्राहकांसाठी पेट्रोल पंपसमोर डिजिटल मोनोलिट लावण्यात येणार आहे. पेट्रोल डिझेल पंपावरही मॅन्युअली पेट्रोल पंपचालकांना दर रोज बदलावे लागतील. या विषयीची 16 जूनपासून अंमलबजावणी होणार असल्याचे चौबे यांनी सांगितले.