शहादा । येत्या 9 ऑगस्टपासुन शहादा तालुका पावसाळी क्रिडा स्पर्धा सुरु होणार आहेत या संदर्भात क्रीडा शिक्षकाना स्पर्धेचे वेळापत्रक व ठिकाणे पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. आता या पावसाळी क्रिडास्पर्धावर क्रीडा शिक्षक बहिष्कार टाकतात की काय? याकडे लक्ष लागले आहे. कारण आधी क्रीडा शिक्षकांनी जिल्हास्तरीय बैठकीत बहिष्काराचा इशारा दिला होता. स्पर्धा ह्या 9 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर पर्यंत रहाणार आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्याचे क्रीडा अधिकार्यांचे आवाहन
त्यात 9 ऑगस्ट बुद्धिबळ वयोगट 17 ते 19 शेठ. व्ही. के. शहा विद्यालय शहादा, 10 ऑगस्ट मुलीच्या गट , व कुस्ती स्पर्धा 19 वर्ष वयोगट ,11 ऑगस्ट व्हॉली बॉल (मुली) 19 वर्ष वयोगट , 26 ऑगस्ट तायक्वांदो सर्व गट महावीर इंग्लिश स्कुल (शहादा ), 28 व 29 ऑगस्ट खो खो स्पर्धा वसंतराव नाईक विद्यालय (शहादा), 4 सप्टेंबर हँडबॉल स्पर्धा सर्व गट लोणखेडा महाविद्यालय ,6 ते 9 सप्टेंबर क्रिकेट स्पर्धा लोणखेडा महाविद्यालय, 9 सप्टेंबर कराटे स्पर्धा सर्वगट शेठ. व्ही. के. शहा विद्यालय (शहादा ) 14 ते 15 सप्टेंबर कबड्डी स्पर्धा सर्व गट आदर्श विद्यालय मंदाणे 22 ते 23 सप्टेंबर मैदानी स्पर्धा सर्व गट लोणखेडा महाविद्यालय या मैदानावर स्पर्धा होतील. क्रिडा शिक्षकांची तालुकास्तरीय बैठक झाली त्यात जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी स्पर्धाची माहिती देवुन स्पर्धा यशस्वी करण्याचे आव्हान केले प्रत्येक स्पर्धाचे चांगले नियोजन करावे असे सांगुन स्पर्धा बाबत तालुक्यात ज्या ज्या शाळामध्ये स्पर्धा आहेत त्यांना पत्र पाठवले जाणार आहेत.