मुंबई- राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना राज्य सरकारने सातव्या वेतन आयोग लागू केले आहे. आजपासून याची अंमलबजावणी होणार आहे. नवीन वर्षाला हे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मानले जाता आहे. राज्य सरकारच्या २५ लाख आजी-माजी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान नगरपालिका कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोगाचा लाभ होणार नसल्याने त्यांनी संप पुकारला आहे. तब्बल ६० हजार कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदविला आहे.
सफाई कामगार, कंत्राटी पद्धतीने काम करणारे कर्मचारी यांनी देखील संपाचा निर्णय घेतला आहे.