आजवर रुपया सर्वाधिक निच्चांक पातळीवर!

0

मुंबई- कच्चा तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि वाढती महागाईचा परिणाम भारतीय चलनावर झाले आहे. गुरुवारी रुपया डॉलरच्या तुलनेत आजपर्यंत सर्वाधिक खाली गेला आहे. कामकाज सुरु झाल्यानंतर डॉलर रुपयाच्या तुलनेत ६९ रुपये असा पोहोचला आहे. रुपया २८ पैसे कमजोर होऊन ६८.६९ प्रती डॉलरवर रुपयाची सुरुवात झाली.

डॉलरच्या तुलनेत रूपयाची सतत पडझड होत आहे. गुरूवारी रूपया अजूनच ढासळला आहे. हा रूपयाच्या मूल्याचा निच्चांक आहे. क्रुड ऑईलच्या वाढत्या किंमती, महागाई, करंट अकाऊंट डेफिसिट वाढल्याने रूपयांच्या मूल्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे सतत रूपयांचे मूल्य खालावत आहे.

घसरणीचे कारण 

अमेरिका आणि चीन यामध्ये ट्रेड वॉर सुरू आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे. यासोबतच महिना अखेरीस तेल कंपनी  (HPCL, IOC, BPCL)यांच्याकडून डॉलरची मागणी वाढते. म्हणूनच या महिन्याअखेरीस भारतीय रूपया  अधिक कमजोर झाला आहे.

कॉंग्रेसकडून सरकारवर टीकेची झोड

भाजपने सत्तेत येण्यापूर्वी कॉंग्रेस आघाडी सरकारवर रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने टीका केली होती. रुपया डॉलरच्या तुलनेत ४५ रुपयावर आणण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. या आश्वासनाचे काय झाले असा प्रश्न कॉंग्रेसकडून उपस्थित केला जात आहे. कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींना याबाबत प्रश्न केला आहे.