मुंबई-गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ सुरूच आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सामान्य त्रस्त झाले आहे. आजही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले. मुंबईत आज पेट्रोल १० पैशांनी तर डिझेल ९ पैशांनी महागले. मुंबईत पेट्रोलचा प्रति लिटर दर ८९ रुपये ५४ पैसे तर डिझेलचा प्रति लिटर दर ७८ रुपये ४२ पैसे इतका आहे.
प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली.
दिल्लीत पेट्रोलचा प्रति लिटर दर ८२ रुपये १६ पैसे आणि डिझेलचा प्रति लिटर दर ७३. ८७ रुपये इतका आहे. दिल्ली, चेन्नई व कोलकाता या तीन महानगरांपेक्षा मुंबईत पेट्रोल- डिझेलचे दर सर्वाधिक आहे. मुंबईत पेट्रोल व डिझेलवर सर्वाधिक मूल्यवर्धित कर असल्याने जास्त पैसे मोजावे लागतात.
प्रमुख शहरांमधील दर
पुणे
पेट्रोल – ८९. ३२ रुपये
डिझेल – ७७.०१ रुपये
औरंगाबाद
पेट्रोल – ९०. ५५ रुपये
डिझेल – ७९. ४५ रुपये
नागपूर
पेट्रोल – ९०. ०२ रुपये
डिझेल – ७८. ९५ रुपये
परभणी
पेट्रोल – ९१. ३२ रुपये
डिझेल – ७८. ९४ रुपये