आजही मुंबई विमानतळावर मेगाब्लॉक

0

मुंबई । मुंबई विमानतळाचा मुख्य रनवे सोमवार आणि मंगळवार दुरुस्तीच्या कामासाठी 6 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान फक्त एकच रनवे कार्यरत आहे, यामुळे अनेक फ्लाईट्सला उशीर झाला. पावसाळ्याआधी दुरुस्तीचे काम करण्यासाठी रनवेवर हा ब्लॉक घेण्यात येत असतो. याबाबत सर्व एअरलाईन्सना आधीच कल्पना देण्यात आली होती.

सुमारे 100 उड्डाणे रद्द
आतापर्यंत एकूण 100 फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या. तर जेट एअरवेजच्या 70 फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या. स्पाइसजेटने आपल्या 18 फ्लाईट्स रद्द केल्या. धावपट्ट्यांची डागडुजी करणे, हे विमान प्राधिकरणासाठी अत्यंत महत्वाचे काम असते. या धावपट्ट्या अधिक दर्जेदार बनवल्याने जास्तीत जास्त उड्डाणे या धावपट्टीवरून होतात, म्हणून धावपट्टींची डागडुजी करण्यात येत आहे.