आजारपणाला कंटाळून एकाची आत्महत्या

0

शिंदखेडा । येथील वरपाडारोड लगत राहणार्‍या जयवंत एकनाथ बेडेसकर (वय-35) वर्षाच्या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. दूपारी 12 वाजेच्या सूमारास ही घटना त्याच्या आईच्या लक्षात आली. रात्री ऊशिरा त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जयवंत हा धूळे येथे सार्वजनिक बांधकाम विभागात शिपाई म्हणून सेवेत होता. धूळे येथील अध्यापकनगर देवपूर धूळे येथे तो पत्नीसह राहत होता. येथील वरपाडा रोडलगत मराठी शाळेच्यामागे त्याची आई राहते. पंधरा दिवसापूर्वी तो येथे आला होता. तब्बेत अतिशय हाडकूळी झालेली होती. आल्यापासूनच आजारी होता. येथिल खाजगी डॉक्टरांकडे तो ऊपचार घेत होता. आज सकाळी अकराला त्याची आई बाजारासाठी बाहेर गेली होती.  तो एकटाच घरी होता.आई बारा वाजता घरी परत आल्यांनतर दरवाजा ऊघडून पाहताच जयवंत ने नारळाची दोरी घराच्या सरीला बांधून गळफास घेतल्याचे दिसले. आईने आरडाओरडा केल्यानंतर परीसरातील नागरींकानी एकच गर्दी केली. सायंकाळी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.  रात्री ऊशिरा त्याचेवर अंत्यसंस्कार आले. त्याचे पश्‍चात आई, पत्नी आणि एक मूलगा असा परीवार आहे. येथील पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.