आजाराला कंटाळून आत्महत्या

0

वरणगाव। सिध्देवरनगरातील रहिवाशी रविंद्र रुपचंद बोदडे (वय 55) याने घरात कोणालाही न सांगता रात्री निघून गेला असता एका विहीरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार 20 रोजी सकाळी 8 वाजेच्या पूर्वीस घटना उघडकीस आली. रविंद्र हा गेल्या महिन्यापासून कॅन्सरच्या आजाराने त्रस्त असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. रविंद्र रुपचंद बोदडे (वय 55, राहणार सिध्देश्वरनगर, ट्रकचालक) याला तीन महिन्यांपासून कॅन्सर आजाराने त्रस्त होता.

विहिरीत आढळला मृतदेह
शनिवार 20 रोजी मध्यरात्री घरात कोणालाही न सांगता घरातून निघून गेला असता पहाटे त्याच्या परिवाराने व मित्रपरिवाराने शोध घेतला असता सिध्देश्वरनगरातील चाँदखेडा शिवरातील सुपडू सुकदेव कोळी यांच्या शेत विहीरीत रावेंद्र बोदडे यांचा मृतदेह आढळून आला. त्याला विहीरीतून काढण्यासाठी गृहरक्षक दलाचे राजेंद्र एकनाथ फालक यांनी विहीरीतील मृतदेह वर काढला.

ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन
मयतास वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. हर्षल चॉदा यांनी शवविच्छेदन केले. मयताच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. अशोक राजाराम बोदडे यांच्या खबरीवरून वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या वरील घटनेचा तपास पीएसआय निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील वाणी, नागेश तायडे, मजहर पठाण करीत आहे.