धुळे। आजारालाकंटाळून 82 वर्षीय वृद्ध महिलेने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. हा प्रकार शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे घडला. वैजंताबाई यशवंत पवार (वय 82) असे संबंधित महिलेचे नाव आहे. त्यांनी 25 मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास स्वत:ला जाळून घेतले.
याबाबत ज्ञानेश्वर पवार यांच्या माहितीवरून शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हे.कॉ. पी.पी.मोरे करीत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.