महिलेचा उचारादरम्यान मृत्यू
हे देखील वाचा
तळेगाव दाभाडे : अपेंडिक्स आजाराला कंटाळून राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्या एका विवाहित महिलेने केला होता. त्यांनतर या महिलेला उचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मृत्यूशी झुंज देताना अखेरीस सात दिवसानंतर सोमटणे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी सकाळी उचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. सुवर्णा अरुण मरगळे (वय 25 रा. लोणावळा) असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत प्राथमिक तपास अधिकारी तथा पोलीस हवालदार के.सी.देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (16 जानेवारी) राहत्या घरी सुवर्णा मरगळे यांनी अपेंडिक्स आजाराला कंटाळून विष प्राशन केले होते. त्यानंतर तातडीने त्यांना लोणावळा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारार्थ गुरुवारी सुवर्णा मरगळे यांना सोमटणेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सात दिवस मृत्युशी झुंज देत असताना उचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.पी.व्ही.फोले यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तसेच आत्महत्तेचा हा गुन्हा 0 क्रमांकाने येथील पोलीस ठाण्यातून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असल्याचे देवरे यांनी सांगितले आहे.