जळगाव । शहरातील पिंप्राळा भागातील भैरव नगर येथील 69 वर्षीय महिलेने राहत्या घरात आजाराला कंटाळून मध्यरात्री जळून घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून रामानंद पोलिस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भैरव नगर, पिंप्राळा येथील अंजनाबाई प्रल्हाद पाटील (वय-69) यांना गेल्या काही महिन्यांपासून ब्लड प्रेशर व अंगावर खाजण्याचा आजार जडला होता.
या आजारावर प्राथमोचार देखील केला मात्र यावर कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याने त्यांनी 8 मार्च रोजीच्या मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना स्वतःला जळून घेतले. इतरांनी ही बाब लक्षात असल्यानंतर त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी श्री. अहिरे यांनी मयत झाल्याची घोषणा केली. वैद्यकिय अधिकारी अहिरे यांच्या खबरीवरून रामानंद पोलिस स्थानकात आमस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास काशिनाथ कोळंबे हे करित आहे.