भुसावळ- तालुक्यातील आचेगाव वना गिरधर पाटील (65, रा.आचेगाव, ता.भुसावळ) यांनी कॅन्सरच्या आजाराला कंटाळून गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कुठल्यातरी धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. आचेगाव जवळील अप रेल्वे लाईन खांबा क्रमांक 462/11 ते 13 दरम्यान त्यांचा मृतदेह आढळला. याबाबत मयताचे शालक नारायण सोपान इंगळे (आचेगाव) यांनी वरणगाव पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार मुकेश जाधव करीत आहेत.