नंदुरबार : आजीकडे आलेल्या 15 वर्षाच्या नातीला जळगाव जिल्ह्यातील तीन जणांनी फूस लावून पळवुन नेल्याची घटना घडली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय नगरमधील विमलबाई कृष्णा पेंढारकर यांच्याकडे 15 वर्षीय नात आली होती. 2 जूनच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास या अल्पवयीन तरुणीला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवुन नेलं, अशी फिर्याद विमल बाई पेंढारकर यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील यावल येथील देवानंद बाळू कोळी, बेबी बाई बाळू कोळी, बाळू गजानन कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.