शनिपेठ परिसरात श्रीरामनवमीनिमित्ताने मिरवणुकीत विनापरवानगी वाजविला डी.जे.
जळगाव : शहरात शनिवारी श्रीराम नवमी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता क्षमतेपेक्षा डेसीबलचे वाद्य व डि.जे.चा वापर केल्याप्रकरणी नगरसेवक मुकुंदा भागवत सोनवणे, माजी नगरसेवक प्रशांत पाटील, कांचन सोनवणे, यांच्यासह 32 जणांविरुध्द मध्यरात्री शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन डी.जे. पोलिसांनी जप्त केले आहेत.
शहरातील शनिपेठ पोलीस चौक, भिलपुरा पोलीस चौकी, घाणेकर चौक, दादर चौक, दाणा बाजार चौक, सुभाष चौक, रथचौक या परिसरातून रामनवमीनिमित्ताने मिरवणूक काढण्यात आली. यात विनापरवानगी डी.जे क्षमतेपेक्षा जास्त डी.जे वाजविल्याने ध्वनी प्रदूषण झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. यात एम.एच 04 बी.यू. 2989, एम.एच 15 सी.के.7312, एम.एच.43 ए.डी.1371 हे डी.जे.असलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांच्या फिर्यादीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले. यात आजी माजी नगरसेवकांसह 32 जणांचा समावेश आहे.
यांच्या विरोधात गुन्हा दाखल
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मुकुंदा भागवत सोनवणे, माजी नगरसेवक प्रशांत पाटील युवराज भागवत सोनवणे, गोविंदा कुंभार, प्रशांत सुरेश माळी, निलेश जोशी (सर्व रा.शनी मंदिर परिसर), संजय सूर्यवंशी, हरीष बडगुजर व इतर 5 ते 6 कार्यकर्ते दुसजया गुन्ह्यात निलेश शंकर तायडे, शुभम प्रल्हाद तायडे, रतिलाल संतोष सोनवणे, लिंबू राक्या चंद्रकांत सोनवणे, गणेश उर्फ बुच्या सुरेश सपकाळे, अजय शिरीष सोनवणे, मनोज सोनवणे व माजी नगरसेवक कांचन सोनवणे यांचे दिर (सर्व रा.वाल्मिक नगर) मयुर तायडे (रा.कांचन नगर) इतर 10 ते 12 कार्यकर्ते तिसजया गुन्ह्यात रोहीत नरेंद्र कोळी, धीरज मंगल कोळी, गोलु जगन्नाथ कोळी (रा.वाल्मिक नगर), सम्राट मनी त्रिपाठी (रा.सुप्रीम कॉलनी), शिवपवन झंवर (रा.आयोध्या नगर), देवेश शेखर तिवारी (रा.चंदू आण्णा नगर), आकाश दशरथ डोळे (रा.हरिओम नगर), राहूल विनोद पासे (रा.काशिनाथ पाटील नगर), भूषण विलास सपकाळे (रा.तानाजी मालुसरे नगर), अतुल सखाराम पाटील (रा.मेस्कोमाता नगर) व शिवम पाटील (रा.मेस्को माता नगर) याच्यासह 8 ते 10 कार्यकर्ते आदींचा समावेश आहे.