आजी-माजी मुख्यमंत्री एकाचवेळी नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

0

मुंबई: राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. ऐन काढणी-कापणीला आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान सरकारकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी होत आहे. आज सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकाच वेळी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरहून दौरा सुरु केला आहे तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कालपासून मराठवाड्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज सोमवार त्यांचा दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. काल त्यांनी उस्मानाबादचा दौरा केला. शेतकऱ्यांकडून भरीव मदतीची मागणी होत आहे.