आजोबांची हत्या करून आरोपी नातू पसार

धुळे : तालुक्यातील वार येथे चुलत नातवाने 68 वर्षीय आजोबांच्या डोक्यात कोयता मारून त्यांची हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेत आत्माराम हिरामण पारधी (68) यांचा मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर पवार-पारधी हा संशयीत आरोपी खुनानंतर पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू आहे. आत्माराम पारधी यांच्या शेजारीच ज्ञानेश्वरच्या आजीचे घर आहे. त्यामुळे त्याचे तेथे नेहमी येणे-जाणे होते. शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे आजीकडे आल्यानंतर त्याने कौटुंबिक वादाची कुरापत काढून शेजारीच असलेल्या आत्माराम पारधी यांच्याशी वाद घातला. यावेळी संतप्त झालेल्या ज्ञानेश्वरने आपल्या हातातील कोयत्याने थेट आत्माराम पारधी यांच्या डोक्यावर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख पथकासह घटनास्थळी दाखल झाले.