अभियंत्यालाही घातला होता गंडा ; सट्टा बेटींगच्या नादामुळे गंडविण्याचा फंडा
जळगाव- ऑनलाईन सट्टा बेटींगचे व्यसन लागले, पैसे खर्च व्हायला लागले, त्यामुळे चक्क आजोबाचेच एटीएमचा पीन कोडव्दारे ऑनलाईन 5 लाख रुपये गंडविले. प्रकार लक्षात आल्यावर घरातून निघाला. यानंतरही सट्टा बेटींगच्या नादात आजोबाचे पेन्शनचे 15 हजार रुपये ऑनलाईन गंडविणार्या नातवाला सायबर पोलिसांनी गुरुवारी गोलाणी मार्केटमधून अटक केली आहे. निशांत तेजकुमार कोल्हे वय 19 रा. कोल्हेनगर असे, त्याचे नाव आहे. अभियंत्याचे ऑनलाईन 40 हजार 188 रुपये गंडविल्याच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला 22 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान त्याच्यावर रामानंद पोलीस ठाण्यातही 80 हजाराच्या सायकल मागवून बजाज फायनान्स कंपनीची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
नागेश्वर कॉलनीतील योगेश सदानंद अहिरराव वय 45 यांचा ब्रोकर म्हणून व्यवसाय आहे. त्याच्या एटीएमची पिन तसेच 16 आकडी माहिती चोरुन स्टेट बँक इंडियाच्या खात्यावरुन पेटीएम, फोन पे यासह वन 97 कम्युनिकेशन या डिजीटला वॅलेटला परस्पर टप्प्याटप्प्याने 40 हजार 188 रुपये वळविल्याचा प्रकार समोर 10 मार्च 2019 रोजी घडली होती. याप्रकरणी त्यांनी 27 मार्च रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
गोलाणी मार्केटमध्ये येताच जाळ्यात
तीन ते चार महिन्यांपासून निशांत सायबर पोलिसांकडून तपास सुरु होता. मोबाईलच्या आधारावर त्याचे नाशिक लोकेशन मिळत होते. त्यानुसार स्वतः पोलीस निरिक्षक अरुण निकम नाशिकला जावून आले मात्र तो गवसला नाही. गुरुवारी तो जळगाव शहरातील गोलाणी मार्केटजवळ असल्याचे लोकेशन मिळाले. त्यानुसार पोलीस नाईक दिलीप चिंचोले व पोलीस कॉन्स्टेबल प्रविण वाघ या दोघांनी पानटपरीवर सिगारेट पित असलेल्या निशांत कोल्हेला अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान ब्रोकरचे 40 हजार 188 रुपये गंडविण्यात त्याच्या जळगावातील एका साथीदाराचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यालाही पथक लवकरच ताब्यात घेणार असल्याचे वृत्त आहे.
सट्टा बेटींगच्या नादापाही सोडले घर
कोल्हे नगरातील निशांतचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले आहे. यादरम्यान ऑनलाईन सट्टा बेटींगचा नाद लागला. खेळण्यासाठी भरपूर पैसे लागतात म्हणून त्याने घरातच वृध्द आजोबाचे एटीएमकार्डची माहिती मिळवून त्याआधारावर सट्टा बेटींग केली. आजोबाच्या प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसात तक्रार केली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल होवून जामीनही झाला होता. यानंतर सुधारेल असे आजोबाला वाटले होते. मात्र घरातच बोंब फुटल्याने निशांतने बाहेरचा रस्ता धरला. तीन ते चार महिन्यांपासून तो फरारच आहे.
पेन्शनचे पैसे काढून पुन्हा आजोबाला गंडा
निशांतचे आजोबा यांनी पुन्हा निशांत असा प्रकार कळणार नाही या विश्वासाने एटीएमकार्ड ब्लॉक केले नव्हते. दहा ते 15 दिवसांपूर्वीच आजोबाचे 15 हजार रुपयांची पेन्शन जमा झाली होती. निशांतला दुसरा पर्याय नसल्याने त्याने पुन्हा आजोबाच्या खात्यावर परस्पर ऑनलाईन पेन्शनची रक्कम लांबविली. दोन ते तीन दिवसांपूर्वीच आजोबाने तक्रार न देता सायबर पोलिसांना प्रकार कळविला होता.
बजाज फायन्स कंपनीचीही फसवणूक
निशांत कोल्हे हा ऑनलाईन पैसे लांबविण्यात मास्टर माईंड आहे. काही दिवसांपूर्वी तो ऑनलाईन पैसे वस्तू तसेच महागडे रिचार्ज करायचा. त्याबदल्यात कमी पैसे घ्यायचा. प्रत्यक्षात बजाज फायनान्सच्या खात्यावरुन पैसे वळवायचा. यात त्याने 84 हजार रुपये किमतीची महागडी सायकल मागविली होती. यानंतर बजाज फायनान्स कंपनीच्या प्रकार लक्षात आल्यावर कंपनीने रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल केला होता.