मुंबई: बंड करून अजित पवार भाजपसोबत उपमुख्यमंत्री झाले होते. मात्र दोन दिवसातच त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पाडले. राष्ट्रवादीत पुन्हा ते परतले आणि त्यांनी राष्ट्रवादीत सक्रीय सहभाग घेतला. मात्र ते राष्ट्रवादीकडून पुन्हा अजित पवार उपमुख्यमंत्री होणार का? याबाबत चर्चा होती. अखेर अजित पवार हेच उपमुख्यमंत्री पदी पुन्हा विराजमान होणार आहे. यावर शिक्कामोर्तब झाल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र याबाबत अजून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. परंतु आज अजित पवार यांचा शपथविधी होणार नाही हे देखील जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रवादीकडून आज दोन आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. यात जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांचा समावेश आहे. त्यामुळे अजित पवार हे आज शपथ घेणार नाही. ३ डिसेंबरला विश्वासदर्शक ठराव घेण्यात येणार आहे, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यावेळीच अजित पवार शपथ घेतील. आज मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहे. सायंकाळी ६.४० वाजता शिवाजी पार्क येथे त्यांचा शपथविधी होत आहे.