मुंबई : टाडा कोर्टाने मुंबई बाँबस्फोटातील दोषी आरोपी फिरोज खान याची याचिका फेटाळून लावत या प्रकरणात दोषी आढळून आलेला आरोपी अबु सालेम याच्यासह सहा आरोपींवरील शिक्षेची सुनावणी उद्या, मंगळवारी टाडा कोर्टात घेण्याचा निर्णय दिला.
फिरोज खानचे वकील अब्दुल वाहेब खान यांनी न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणात दोषींवर शिक्षेची सुनावणी करण्यापूर्वी अवधी मागितला होता. मात्र न्यायालयाने त्याला स्पष्ट नकार दिला. टाडा न्यायालयाने शुक्रवारी बाँबस्फोट प्रकरणात अबु सालेमससह सात आरोपींवर सुनावणी करतांना सालेमसह सहा आरोपींना दोषी ठरवले आणि सातवा आरोपी अब्दुल कय्यूम याला वैयक्तीक बॉन्डवर सोडून दिले.