आज अमित शहा मातोश्रीवर; उद्धव ठाकरे यांची ‘एकला चालोरे’ची भूमिका

0

मुंबई : भाजपने शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी सर्व बाजुने प्रयत्न सुरु केले आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपने आता शिवसेनेला केंद्रात आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद देण्याची तयारी केली आहे. जुलैमध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यावेळी शिवसेनेचा विचार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला राज्यसभा उपसभापतीपदही दिले जाण्याची शक्यता आहे. आज अमित शाह मातोश्रीवर जाणार आहेत. या भेटीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने लोकसभा निवडणूक युती करून लढावी, असी भाजपा नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेगलू देसमच्या वाट्याची मंत्रिपदे अन्य मित्रपक्षांना दिली जाण्याची शक्यता असून यात शिवसेनेला आणखी एका मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते.

शिवसेना स्वतंत्र लढणार
आज अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांनी भेटीआधीच सामना संपादकीयच्या माध्यमातून २०१९च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणारच अशी गर्जना केली आहे. अमित शहा यांचे लक्ष्य लोकसभेतील किमान ३५० जागांचे व तेही स्वबळावर जिंकण्याचे आहे. त्यांच्या जिद्दीस सलाम करावा लागेल. देशात पेट्रोलचा भडका उडून महागाईचा वणवा पेटला आहे, शेतकरी संपावर आहेत व शेतकऱ्यांशी सरकारचा संपर्क तुटल्याने संप मोडून काढण्याचे काम सुरू आहे. पालघर साम, दाम, दंड, भेदाने जिंकले तसे साम, दाम, दंड, भेद वापरून शेतकरी संप मोडून काढू असेच जणू सुरू आहे. अशा परिस्थितीत मोदी जगात व शहा देशात संपर्क मोहीम राबवत आहेत. त्यांच्या संपर्क कलेचे कौतुक करावे तेवढे थोडेच असा टोला उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मारला आहे.