आज कुमारस्वामी बहुमत सिद्ध करणार

0

बंगळुरु : जनता दल (सेक्युलर)चे नेते एच. डी. कुमारस्वामी आज विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. दरम्यान, याआधी भाजपचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच राजीनामा दिला. त्यामुळे भाजपला प्रथम संधी देऊनही त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. त्यामुळे राज्यपाल यांनी कुमारस्वामी यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले. काल त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज कुमारस्वामी बहुमत सिद्ध करणार आहेत.