आज गुगलचा २० वा वाढदिवस

0

न्यूयॉर्क- जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलचा आज २० वा वाढदिवस आहे. गुगलने आपल्या २० व्या वाढदिवसानिमित्त खास डूडल तयार केले आहे.

२० वर्षांआधी गुगलला स्टानफोर्ड यूनिव्हर्सिटीतील दोन पीएचडी विद्यार्थी लॅरी पेज आणि सर्गे ब्रिनने सुरु केले होते. त्यांनी पहिले Google.stanford.edu यावर एक इंटरनेट सर्च इंजिन तयार केले. याचे नाव BackRub ठेवले. नंतर ते बदलून गुगल करण्यात आले.

१५ सप्टेंबर १९९५ मध्ये Google.com डोमेनचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. पण गुगल कंपनी म्हणून ४ सप्टेंबर १९९८ मध्ये रजिस्टर केली गेली.

१९९८ मध्ये जेव्हा गुगलची सुरुवात झाली तेव्हा जगभरात वर्ल्ड वाइड वेब(WWW) वर साधारण २५ मिलियन पेज उपलब्ध होते. त्यावेळी गुगलचे अल्गोरिदम चांगलं होतं. त्यावेळी काही सर्च केलं तर २.५ कोटी पेजची माहिती मिळत होती. गुगल तयार करण्याचा उद्देश जगभरातील माहिती लोकांपर्यंत पोहचवणे हा होता. गुगल आज १५० पेक्षाही अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे.