पुणे : आज रक्षाबंधनाचा सण असून आजच चंद्रग्रहणही होणार आहे. रात्री चंद्रग्रहणाला सुरूवात होईल आणि दूसर्यादिवशी ग्रहण सुटेल. हे ग्रहण भारतासह आशिया, युरोप आणि अफ्रिकेतून दिसणार आहे. यानंतर 21 ऑगस्ट रोजी होणारे पूर्ण सूर्य ग्रहण आफ्रिका आणि भारतासह आशियातील काही ठिकाणांहून दिसणार आहे.
आज रक्षाबंधनच्या दिवशी होत असलेले चंद्र ग्रहण रात्री 10.52 ला सुरू होईल आणि ते 12.22 पर्यंत राहिल. हे ग्रहण पूर्ण नसून खंडग्रास आहे. सकाळी 11.07 पासून दुपारी 1.50 वाजेपर्यंत रक्षाबंधनसाठी शुभ वेळ असल्याचे पंचांगात म्हटले आहे.