मुंबई । ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास पद रद्द करण्याचा अजब फतवा, कर्नाटकचे नगर विकासमंत्री रोशन बेग यांनी दिला. त्यानंतर महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे. त्याला प्रत्यूत्तर म्हणून शिवसेना बेळगावात गुरूवारी मोर्चा काढणार असून त्याचे नेतृत्व परीवहनमंत्री दिवाकर रावते आणि आरोग्यमंत्री दिपक सावंत करणार आहेत. ज्या ज्या वेळी असे प्रसंग घडले तेव्हा तेव्हा शिवसेना बेळगावात धडकली आहे.
यापुर्विही सेना धावली मराठी माणसासाठी
बेळगावच्या महापौरांना काळे फासण्यात आले आणि संयुक्त महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला कर्नाटक सरकारने विरोध दर्शवला तेव्हा विधानसभेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदासभाई कदम यांनी सरकारचा विरोध मोडून बेळगावात मुसंडी मारली होती. सभेला परवाणगी नाकारली असतानाही प्लास्टीक टेबलवर उभा राहून भाषण ठोकले होते. त्या आधी छगन भुजबळांनी शिवसेनेच्या वतीने मराठी माणसांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. तेव्हा अमाणूष लाठीचार्ज करण्यात आला होता. भुजबळांनी वेशांतर करून कन्नड पोलिसांना चकवा देत बेळगावात मुसंडी मारली होती.
स्वामिनचीही उडी
बेळगावकरांच्या या आंदोलनात स्वाबिमान संगटनेनेही उडी घेतली असून कर्नाटक परिवहन सेवेच्या बसला आडवून त्यांनी त्या गाडीवरच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला जय महाराष्ट्र अशा घोषणा द्यायला लावल्या.
केंद्राकडे तक्रार करू
बेळगावातील मराठी माणसांबद्दल कर्नाटकच्या मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्राकडून निषेध आहे. बेग यांची भाषा खपवून घेतली जाणार नाही, देशात कोणालाही ‘जय महाराष्ट्र’ बोलण्यापासून थांबवता येणार नाही. भारताच्या संविधानाने तो अधिकार दिलेला आहे. याबाबत पत्र लिहून केंद्र सरकारकडे तक्रार करू.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
संभाजी चौकातून हा मोर्चा सुरु होणार
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या जय महाराष्ट्र विरोधकांना विरोध दर्शवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात शिवसेनेचे हे दोन मंत्री सहभागी होणार आहेत. तेथे ते ‘जय महाराष्ट्रचा नारा बुलंद करणार आहेत, असे शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजता संभाजी चौकातून हा मोर्चा सुरु होणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाननंतर दीवाकर रावते आणि दीपक सावंत हे दोघे जण मोर्चात सहभगी होऊन बेळगावात जय महराष्ट्रचा एल्गार करणार आहेत.
शिवसेना-मनसेचे चोख उत्तर
बेग यांना शिवसेनेने आणि मनसेने चोख प्रत्युत्तर दिले. कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकात येणार्या कर्नाटक राज्याच्या बसगाड्यांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून त्या बस कर्नाटकात परत पाठवल्या आहेत. मनसेने ठाणे बस स्थानकातील कर्नाटकच्या बसवर जय महाराष्ट्र असे रंगवून निषेध नोंदवला. जय महाराष्ट्रचे स्टिकर कर्नाटक परिवहनच्या बसवर लावल्याने पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे.