जळगाव: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जळगाव जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या उमेदवारांसाठी सभा होणार आहे. भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तर शेंदुर्णीला राष्ट्रवादीचे उमेदवार संजय गरुड तर चाळीसगावला राजीव देशमुख यांच्या प्रचारार्थ शरद पवार, फैजपूरला एमआयएमचे उमेदवार विवेक ठाकरे यांच्यासाठी खासदार असुदुद्दीन ओवेसी सभा घेणार आहे. तिनही पक्षाचे मोठे नेते आज जिल्ह्यात असल्याने याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
एकंदरीत हाय व्होल्टेज अशी या सभा होणार आहे.