मुंबईः छोट्या पडद्यावरून घरारात पोहोचलेला आणि रसिकांची मने जिंकणारा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आज संध्याकाळी सात वाजता बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. महाअंतिम सोहळ्याच्या जय्यत तयारीला देखील सुरूवात झाली आहे.
अंतिम फेरीतील स्पर्धक नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, वीणा जगताप, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर आदी सहा सदस्य अंतिम फेरीत पोहोचले आहे. दरम्यान किशोरी शहाणे, आरोह वेलणकर घराबाहेर पडले आहे.