आज तरी तोडगा निघणार का? भाजप कोअर कमिटीची बैठक !

0

मुंबई : गेल्या १५ दिवसांपासून राज्यात सत्ता संघर्ष शिंगेला पोहोचले असल्याने अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. दरम्यान राज्यपालांकडून काल शनिवारी सत्ता स्थापनेसाठी भाजपला निमंत्रण देण्यात आले आहे. उद्या ११ नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत राज्यपालांकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची आज रविवारी कोअर कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत भाजप सत्ता स्थापनेबाबत ठोस असा निर्णय घेऊ शकते. ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे.

11 नोव्हेंबर रोजी राज्यपालांकडून बोलावण्यात आले आहे. मात्र राज्यपाल भाजपला सत्ता स्थापनेसाठी किती दिवसांची मुदत देतात याकडे साऱ्यांचच लक्ष आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे.