तापी उत्थान एवं उत्सव सेवा समिती, सप्तश्रृंगीमाता बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम
भुसावळ : शहराला लाभलेल्या तापी नदीच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून तापी उत्थान एवं उत्सव सेवा समिती, सप्तश्रृंगी माता बहुउद्देशीय संस्था, राजस्थानी महिला मंडळ, बहुभाषिक ब्राह्मण समाज मंडळ, जयलेवा ग्रुप, बजरंग भजनी मंडळ, नॅशनल युथ क्लब, प्रभात फेरी भक्त मंडळ आदी संस्थातर्फे विविध धार्मिक तसेच पर्यावरणासंबंधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तापी नदीचे धार्मिक तसेच भौगोलिक महत्त्व लक्षात घेता भुसावळात सार्वजनिकरित्या तापी नदी जन्मोत्सव साजरा केला जातो.सप्तशृंगी बहुउद्देशीय संस्था, बालाजी महिला बचत गट, बहुभाषिक ब्राह्मण मंडळ, बजरंग भजनी मंडळ, प्रभातफेरी भक्त मंडळ आदी संस्थांच्या सहभागाने सकाळी 10.30 वा. तापीनदीवरील इंजिन घाटाजवळ तापी नदी जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.ब्राह्मणवृंद व मान्यवरांच्या हस्ते तापीनदीला अर्घ्यपूजन, 108 मिटर अंखड साडीचे महावस्त्र अर्पण व आरती करून नदीची ओटी भरली जाणार आहे.
सुरत येथील भाविकांनी अखंड साडी दिली
संस्थेचे तापीनदी विषयीचे कार्य पाहून यंदा सुरत येथील तापी भक्तांनी 108 मिटर लांब अखंड साडी जन्मोत्सवासाठी भुसावळातील तापीभक्त दीपकलाल जैन यांनी संस्थेला सुपुर्द केली आहे. या महासाडीचे तापी नदीला उद्या अर्पण केले जाईल. तसेच यावेळी उपस्थित भक्तांना रोपे वाटप करण्यात येणार आहे.तरी या जन्मसोहळ्यात परिसरातील सर्व तापी प्रेमी जनतेने उपस्थिती द्यावी, असे आवाहन तापी उत्थान एवं उत्सव सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत वैष्णव यांनी केले आहे.
यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
तापी जन्मोत्सव यशस्वीतेसाठी समितीचे श्रीकांत जोशी, पं.रवीओम शर्मा, जयप्रकाश शुक्ला, कैलास उपाध्याय, नीरज तिवारी, गोपाळ जोशी, रवींद्र पुरोहित, गोविंद अग्रवाल, मोटू वर्मा, सुकदेवप्रसाद चौरसिया, संतोष टाक, अशोक धांडे, सोमनाथ चौरसिया, दिनेश महाजन, महेश फालक, सचिन पाटील, भारती वैष्णव, अॅड.मेघा वैष्णव, वैशाली सोनार, जे.बी.कोटेचा, पवन दरगड, उमेश नेवे, विलास पाचपांडे, सुरेश शर्मा, श्रीकृष्ण चोरवडकर, दिनेश सोनार, ज्योती शर्मा, संगीता शर्मा, अक्षय शर्मा, रोहीत नेमाडे, अमोल सोनार आदी परिश्रम घेत आहेत.