आज पुन्हा पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत घट !

0

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे गेल्या ११ दिवसांपासून देशात इंधन दरवाढीत कपात झाली आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर ४० पैशांनी कमी झाली आहे तर डिझेलची किंमत प्रति लिटर ३३ पैशांमी कमी झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल आज प्रति लिटर ८०.०५ रूपये तर डिझेल ७४.०५ रूपये प्रति लिटर किंमतीमध्ये मिळणार आहे.

मुंबईमध्ये पेट्रोल ३९ पैशांनी आणि डिझेल ३५ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे मुंबईत आज पेट्रेलचे प्रति लिटर दर ८५.५४ रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर ७७.६१ रुपये असणार आहेत. गेल्या ११ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सध्या भारतामध्ये दिवाळीच्या सणाची खरेदी सुरू आहे. त्यात इंदर कपातीमुळे सर्वसामन्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. गेल्या ११ दिवसांमध्ये पेट्रोल प्रति लिटर २.७५ तर तर डिझेल प्रति लिटर १.७४ रूपयांनी स्वस्त झाले आहे.