आज पुन्हा पेट्रोल-डीझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर !

0

मुंबई-गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली जात होती. मात्र दरकपातीनंतर आता पुन्हा पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज बुधवारी पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल १३ पैशांनी तर डिझेलमध्ये २० पैशांनी वाढ झाली आहे. तर दिल्लीत पेट्रोलच्या दरात १३ पैशांनी डिझेलच्या दरात १९ पैशांनी वाढ झाली आहे.

मुंबईत पेट्रोल ७६.९० तर डीझेल ६९.०१), पुण्यात ७६.७७ पेट्रोल तर ६७.८१ डीझेल, नागपूरात पेट्रोल ७७.३८ डीझेल ६९.५३, नाशिकमध्ये पेट्रोल ७७.३९ तर डीझेल ६८.४१, ठाण्यात पेट्रोल ७६.८६ तर डिझेल प्रती लिटर ६८.८९ असे आहेत.