मुंबई- बुधवारी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया पुन्हा कमजोर झाला आहे. जागतिक आघाडीवर डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरु आहे. अंशत: घसरण झाल्याने रुपया डॉलरच्या तुलनेत 73.52 वर पोहोचला आहे. काल मंगळवारी 73.48 वर होता. आज 4 पैशांनी कमजोर आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्याने महागाईत देखील वाढ होत आहे.