जळगाव। पुरोगामी सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचे रविवारी 9 रोजी शानभाग सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले आहे. प्रभात चौकातील शासनभाग मंगल कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता मेळावा घेण्यात आला आहे. विविध जाती समुहाचे सामाजिक ऐक्य निर्माण करणे, 17 सप्टेंबर रोजी सामाजिक ऐक्य परिषद यशस्वी करणे यासह विविध विषयावर राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष भानुदास विसावे, नॅशनलिस्ट नेटिव्हज अध्यक्ष सुनिल भालेराव, स्वाभिमानी भारत अभियान तथा प्रदेशचे मुख्यसचिव धर्मभुषण बागुल आदी मान्यवर यावेळी मार्गदर्शन करणार आहे.
जिल्हा व शहरातील अल्पसंख्यांक व मागास जातीसाठी काम करणार्या संघटनांनी आपल्या पदाधिकार्यांसह जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन एकलव्य संघटना, राष्ट्रीय चर्मकार महासंघ स्वाभिमानी अभियान, एनएनएफ संघटनातर्फे करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष पांडुरंग बाविस्कर, स्वाभिमानी भारत अभियानाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी केले आहे.