आज फायनलचा रोमांच

0

बंगळूरू: पहिल्यांदा कसोटी मालिका त्यानंतर एकदिवसीय मालिकेत जबरदस्त विजय मिळविल्यानंतर आता टीम इंडियाने २० ट्वेंटी मालिकेसाठी देखील दंड थोपटले आहेत. १-१ अशी बरोबरी साधल्यानंतर कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी इंग्लंडचा संघ देखील तयार असून फायनल रोमांचक होणार हे मात्र नक्की. दुसऱ्या सामन्यात रोमांचक विजय मिळविल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला असून कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वात लगातार तिसऱ्या फॉरमॅटमध्ये विजयासाठी सज्ज झाले आहेत. २० ट्वेंटीच्या मालिकेत आतापर्यंत इंग्लंडचा संघ वरचढ ठरलेला असून विराटची ही अग्निपरीक्षा मानली जात आहे. कसोटीपाठोपाठ वन-डे मालिका जिंकणाऱ्या टीम इंडियाला टी-२० मालिकेत आव्हान कायम राखण्याचे लक्ष्य आहे.

गोलंदाजीत कामगिरी उंचावली
पहिल्या सामन्यात कानपुरात घडले त्याची पुनरावृत्ती रविवारी नागपुरात होणार की काय, अशी परिस्थिती ओढवली असतानाच जसप्रीत बुमराह आणि आशिष नेहरा मदतीला धावले. बुमराहने मोक्याच्या क्षणी १२ चेंडूंत पाच धावांत दोन गडी बाद करीत भारताला रविवारी येथील व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी-२० लढतीत इंग्लंडविरुद्ध पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. विराट अ‍ॅन्ड कंपनीने दडपणातही गोलंदाजीत कामगिरी उंचावून मालिकेत चुरस कायम राखली. या विजयामुळे भारताने व्हीसीएवर पराभवाची मालिकादेखील खंडित केली आहे. कसोटीपाठोपाठ वन-डे मालिका जिंकणाऱ्या टीम इंडियाला टी-२० मालिकेत आव्हान कायम राखण्याचे लक्ष्य आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील कानपूरचा पहिला सामना गमाविल्याने १५ महिन्यांत पहिल्यांदा मालिका गमाविण्याची नामुष्की आली होती. ही नामुष्की टाळण्यासाठी विराटच्या नेतृत्वाखालील संघाला व्हीसीएवर इंग्लंडला पराभवाची चव चाखविणे क्रमप्राप्त झाले होते.

एकमेव कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर
मुंबई : बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. इराणी करंडकात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या आणि दुखापतीतून सावरलेल्या वृद्धिमान साहाचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. 9 फेब्रुवारीपासून बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. आज निवडण्यात आलेल्या संघात वृद्धिमान साहाला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यात खेळणाऱ्या पार्थिव पटेलला संघातील स्थान गमवावे लागले आहे. साहा बरोबरच सलामीवीर अभिनव मुकुंदनेही दीर्घकाळानंतर संघात पुनरागमन केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झालेला मुंबईकर अजिंक्य रहाणेही संघात परतला आहे. या कसोटीसाठी फिरकी गोलंदाज अश्विन आणि जडेजाबरोबरच जयंत यादव आणि अमित मिश्रालाही संघात स्थान देण्यात आले आहे. तर मध्यमगती गोलंदाजीची मदार उमेश यादव, इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमारवर असेल.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, उमेश यादव, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, अभिनव मुकुंद, हार्दिक पांड्या