तळोदा। जिल्ह्याच्या मुख्यालयी जोडणारा तळोदा व धडगांव तालुक्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेला हातोडा पुलाचे लोकाग्रहस्तव उद्या लोकार्पण होणार आहे.भूमीपूजनापासून बहुचर्चित तापी नदीवरील हातोडा पूल अखेर जिल्ह्यातील लोकप्रतिधींच्या उपस्थित स्वतंत्र दिनापासून वापरास खुला करून लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे यावेळी हिरवी झेंडी पालक मंत्री जयकुमार रावल सकाळी 12 वाजता दाखवणार आहे.नंदुरबार जिल्ह्याच्या मुख्यालयी तळोदा व धडगांव तालुक्याचा अत्यंत महत्वाचा जवळचा मार्ग असलेला तापी नदीवरील हातोड़ा पुल असून हा पूल आता वाहतुकीस खुला करणे अर्थात उद्घाटनापयर्ंत बहुचर्चित राहिला आहे. याबाबत आज आमदार पाडवी यांनी जिल्हाधिकारी मलीनाथ कलशेट्टी व खासदार हिनाताई गावित,आ,चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री सुरुपसिंग नाईक ,अॅड. के. सी. पाडवी यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क साधून जनतेचा भावना लक्षात घेत पूल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्या पालकमंत्री जयकुमार रावल ध्वजारोहणासाठी नंदूरबारला येत असून यानंतर दुपारी 12-30 ला पुलाला हिरवा झेंडा दाखवून पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. 15 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. हिरवी झेंडी जिल्ह्याचे पालक मंत्री तथा पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, खा. हिना गावित, आ. उदेसिंग पाडवी, आ. विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी कलशेट्टी, आ चंद्रकांत रघुवंशी आ. के. सी. पाडवी यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी उपस्थितीत व यांचा हस्ते दाखवून रहदारीस खुला करण्यात येणार आहे असे आमदार पाडवी यांनी सांगितले.यावेळी हातोडा पुलावर आमदार पाडवी सोबत, अजय परदेशी, डॉ स्वप्नील बैसाने, संजय पटेल, प्रसाद बैकर, शिरीष माळी, नंदूरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अनिल पिपले आदी उपस्थित होते. या पलाच्या कामाला 2007 साली सुरुवात झाली असून अनेक वर्षांपासून बहुप्रतिक्षित होता. तब्बल दहा वर्षांनी पूर्ण झाला आहे. मात्र अवजड वाहनांसाठी तांत्रिक अडचण असल्याने शालेय बस, रुग्णवाहिका, छोट्या चारचाकी वाहन व दुचाकीला फक्त परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे ट्रक व कंटेनर, मालवाहतूक करणारे अवजड वाहनास तूर्तास तरी कोणताही सूट दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी दोघ बाजूला पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक सुनियंत्रीत होणार आहे.