आज भारत इंग्लंड भिडणार

0

लंडन । महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारत इंग्लड रविवारी भिडतील. इंग्लंडने ही स्पर्धा यापूर्वी तीन वेळा जिंकली आहे, तर भारताने दुसर्‍यांदा स्पर्धेच्या निर्णायक लढतीत स्थान मिळवले आहे. 2005 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यावेळी पुन्हा एकदा भारत विश्वचषकापासून एक पाऊल लांब आहे. त्यामुळे दोन वेळा पुरुषांचा विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ यावेळी महिला विश्वचषकाचा दुष्काळ संपवतोय का? याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

50 लाखांचे बक्षीस
महिला विश्वचषक स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करणार्‍या महिला संघावर अंतिम सामन्याआधीच बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे. बीसीसीआयने संघातील प्रत्येक खेळाडूला 50 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.