पुणे : राज्यात काही भागात किमान तापमान सरासरीच्या आसपास असल्याने गारवा कायम आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्याच्या हवामानावर परिणाम होत असून आज २ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
उत्तर भारतातील जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरयाणा आदी भागांतील थंडीचे प्रवाह कायम आहेत. राज्यात काल गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ८.४ अंश किमान तापमानाची नोंद झाली.