आज मुंबई पॅसेंजरसह अप-डाऊन पंचवटी व राज्यराणी एक्स्प्रेस रद्द

0

कुर्ला-सायनमध्ये ट्रॅफिक ब्लॉक ; अनेक गाड्या धावणार विलंबाने

भुसावळ- मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कुर्ला आणि सायन दरम्यान नवीन सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी रविवार, 12 रोजी विशेष ट्रॅफिक तसेच इंजिनिअरींग ब्लॉक घेण्यात येत असून त्यामुळे मुंबई पॅसेंजरसह अप-डाऊन पंचवटी व राज्यराणी एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून अनेक गाड्यांना दादर रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवण्यात येणार असल्याने रेल्वे प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहेत.

आज या गाड्या झाल्या रद्द
गाडी क्रमांक डाऊन 51153 मुंबई-भुसावळ पॅसेंजर, गाडी क्रमांक 22102 अप मनमाड-सीएसएमटी मुंबई राज्यरानी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 22101 डाउन सीएसएमटी मुंबई-मनमाड राज्यरानी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12110 अप मनमाड-सीएसएमटी मुंबई पंचवटी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12109 डाउन सीएसएमटी मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

दादरमध्ये अडीच तास गाड्यांना थांबा
गाडी क्रमांक 12112 अमरावती-सीएसएमटी मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस तसेच गाडी क्रमांक 12106 गोंदिया-सीएसएमटी मुंबई विदर्भ एक्सप्रेसला दादर रेल्वे स्थानकावर दुपारी अडीच ते पाच या दरम्यान थांबवण्यात येणार आहे तसेच ब्लॉक कालावधीदरम्यान सीएसएमटी मुंबई, दादर येथे येणार्‍या इतर मेल, एक्सप्रेस गाड्या ठिकठिकाणी थांबवण्यात येणार असून त्या उशिराने धावणार आहेत. रेल्वे प्रशासनाला प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

उद्या नरखेड, अमरासह सहा पॅसेंजर गाड्या रद्द
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील बडनेरा सेक्शनमध्ये पुलाच्या पुर्नबांधणीच्या कामासाठी सोमवार, 13 रोजी विशेष इंजिनिअरींग ब्लॉक घेण्यात येणार असून त्यासाठी सहा पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्यात आहेत. रद्द गाड्यांमध्ये गाडी क्रमांक डाऊन 51183 भुसावळ-नरखेड पॅसेंजरस, अप 51184 नरखेड-भुसावळ पॅसेंजर (14 मे रोजी), गाडी क्रमांक 51152 अप नखेड-नवी अमरावती पॅसेंजर तसेच डाऊन 51151 नवी अमरावती-नरखेड पॅसेंजर (14 मे रोजी), गाडी क्रमांक डाऊन 51197 भुसावळ-वर्धा पॅसेंजर तसेच अप 51198 वर्धा-भुसावळ पॅसेंजर (14 मे रोजी) रद्द करण्यात आली आहे. या ब्लॉकमुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रवाशांना केले आहे.