नवी दिल्ली: कलम ३७० रद्द केल्यानंतर कॉंग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान आज शनिवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. राहुल यांच्यासोबत विरोधी पक्षातील 9 नेतेही सोबत असणार आहेत. कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये गेल्यानंतर तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्याचसोबत स्थानिक नेत्यांसोबतच सामान्य नागरिकांची राहुल गांधी भेट घेणार आहेत तसेच जनतेशी संवाद साधणार आहेत. यापूर्वी जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्यासाठी निमंत्रण दिले होते.
कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.