मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक विविध विषयांवर चित्रपटांची निर्मिती होत आहे. आज सर्रास एकाच दिवशी दोन किंवा तीन चित्रपट सहज प्रदर्शित होताना दिसतात. मात्र आज एकाचवेळी पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
१. द जर्नी ऑफ कर्मा – शक्ती कपूर आणि पूनम पांडे या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटामध्ये पूनमने आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दर्शविणाऱ्या तरुणीची भूमिका साकारली आहे. तर शक्ती कपूरने एका वयस्कर व्यक्तीची भूमिका साकारली आहे.
२. बाजार – सैफ अली खान, राधिका आपटे, चित्रांगदा सिंग यांची केमिस्ट्री ‘बाजार’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये ‘बडा आदमी बनना है तो लाइन क्रॉस करनी होगी’ म्हणणाऱ्या शकुन कोठारी या व्यावसायिकाची कथा आहे.
३. ५ वेडिंग्स – राजकुमार राव हा कायमच वेगवेगळ्या भूमिका वठवितांना दिसत असतो. चित्रपटाची कथा एका अमेरिकन पत्रकारावर आधारित आहे.राजकुमारसोबत अभिनेत्री नर्गिस फखरीही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
४. काशी – इन सर्च ऑफ गंगा – शर्मन जोशीने ‘काशी’ या व्यक्तीची भूमिका वठविली असून बेपत्ता झालेल्या ‘गंगा’ या बहीणीचा शोध घेण्यासाठी काशीने केलेली धडपड या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=8qtQ0wSO2d8
५ . दशहरा – पॉलिटीकल ड्रामा असलेला ‘दशहरा’ हा चित्रपट आहे. यात नील नितीन मुकेश हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.